ज्यांच्या नावाची चर्चा त्यांचा पत्ता कट… भाजपने दिली तिसऱ्यालाच उमेदवारी

मुंबई | राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाख खडसे आणि माजी खासदार संजय काकडे यांना तिकीट मिळणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र भाजपने दुसऱ्या यादीत औरंगाबादचे माजी महापौर भागवत कराड यांना तिकीट दिलं आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे. संख्याबळानुसार महाविकास आघाडीचे चार, तर भाजपचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात. राष्ट्रवादी दोन तर काँग्रेस-शिवसेना प्रत्येकी एक जागा लढणार असल्याचं बोललं जात होतं.

भाजपने पहिल्या यादीत महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आता भागवत कराड यांनाही उमेदवारी देऊन 7 पैकी 3 जागांवर दावा केला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रतील 7 जागांसााठी उमेदवार ,उदयनराजे भोसले- भाजप, भागवत कराड- भाजप, रामदास आठवले- भाजप पुरस्कृत, शरद पवार- राष्ट्रवादी, फौजिया खान- राष्ट्रवादी, शिवसेना- प्रियंका चतुर्वेदी, अशी नावं आहेत.

महत्वाच्या बातम्या –

सुपरस्टार रजनीकांत राजकारणाच्या आखाड्यात; करणार नवीन पक्षाची स्थापना

-राहुल गांधींनी पदरी पडलेल्या संधीचे वाटोळे केले; संघाचे टिकास्त्र

-स्टेट बॅंकेने घेतले तीन मोठे निर्णय; SBI मध्ये खातं असेल तर नक्की वाचा

-“फक्त आजच नाही तर 365 दिवस शिवजयंती साजरी करायला पाहिजे”

-कोरोनाच्या भीतीने स्वत:ला घरात कोंडून घेतलं; दोघांवर मानसिक उपचार सुरु