Loading...
पुणे महाराष्ट्र

बॅकफूटला गेलेल्या भाजपला गुड न्यूज!

सांगली |  राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळ्यात मोठा पक्ष ठरून देखील भाजप बॅखफूटला गेल्याचं चित्र आहेत. 105 आमदार असूनही भाजपला सत्तास्थापन न करता आल्याने काही भाजप आमदारंमध्ये गेली काही महिने  नाराजी आहे. मात्र भाजपला आज चांगली गुडन्यूज मिळाली आहे. सांगली महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपच्या गीता सुतार तर उपमहापौरपदी आनंदा देवमाणे या विजयी झाल्या आहेत.

गीता सुतार यांनी आघाडीच्या उमेदवाराचा अवघ्या 7 मतांनी पराभव केला आहे. आघाडीच्या उमेदवार गीता निंबाळकर यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचं स्वप्न भंगलेल्या भाजपला बऱ्याच दिवसांनी गूडन्यूज मिळाली आहे.

Loading...

भाजपाच्या गीता सुतार यांना महापौरपदाच्या निवडणुकीत 43 मतं मिळाली तर आघाडीच्या वर्षा निंबाळकर यांना 35 मतं मिळाली. आघाडीच्या वर्षा निंबाळकर तर उपमहापौर पदाच्या योगेंद्र थोरात यांचा पराभव झाला आहे.

दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सत्तासमीकरणांमध्ये अमुलाग्र बदल झाला. भाजपच्या एकेकाळच्या मित्राने म्हणजे शिवसेनेने काडीमोड घेत काँग्रेस राष्ट्रवादीशी सलगी केली. या सगळ्यांमुळे 105 आमदार असूनही भाजप बॅकफूटला गेल्याचं चित्र आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुंबई भाजपमध्ये अध्यक्ष हटवण्याच्या जोरदार हालचाली; या नेत्यांची नावे चर्चेत

-दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही मोफत वीज!

-“भाजपचे अनेक माजी मंत्री शिवसेनेत जाण्याच्या तयारीत आहेत”

-दिल्ली नंतर भाजपचं महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’?

-केजरीवाल सरकारचं ‘दिल्ली मॉडेल’ इतर राज्यांत राबवा; शिवसेनेचा नरेंद्र मोदींना सल्ला

Loading...