महाराष्ट्र मुंबई

‘सरकारला जाग कधी येणार?’; KEM रुग्णालयाचा व्हिडीओ पोस्ट करत राम कदमांचा सरकारला सवाल

RAM KADAM

मुंबई | केईएम रुग्णालयात रुग्णांना खाली बसण्याची वेळ आली आहे. अनेक रुग्ण जमिनीवर बसले आहेत. त्यांच्या वैद्यकीय सेवेचं काय? काहीच नाही का? अत्यंत दुःखद बाब. महाराष्ट्र सरकारला कधी जाग येणार?, असे प्रश्न विचारत भाजपचे नेते राम कदम यांनी केईएम रुग्णालयातला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

हा व्हिडीओ आज सकाळी 11 वाजून 45 मिनिटांचा असल्याचंही राम कदम यांनी म्हटलं आहे. तसंच रुग्णांच्या अवस्थेवरुन त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

या व्हीडिओमधील रुग्णालयात अनेक रुग्ण जमिनीवर बसले आहेत. त्यांच्याकडे डॉक्टरांचं दुर्लक्ष होतं आहे. तसंच मधूनच कुणतरी स्ट्रेचरवरुन रुग्णांना घेऊन जातंय मात्र खाली बसलेल्या रुग्णांकडे कुणाचं लक्ष नाही. हा सगळा प्रकार या व्हिडीओत राम कदम यांनी दाखवला आहे.

दरम्यान, याधी नितेश राणे यांनीही सायन रुग्णालय आणि केईएम रुग्णालय येथील व्हिडीओ पोस्ट केले होते आणि सरकारला जाब विचारला होता.

 

महत्वाच्या बातम्या-

-महिलेच्या बाळंतपणात सुप्रिया सुळेंची मायेची ऊब, माहेरहून आईला आणण्यासाठी केली मदत

-शेतीसाठी केंद्र सरकारकडून आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या पॅकेजची घोषणा

-पावसाचं धुमशान… पाहा पावसाचे व्हिडीओ

-कोरोनाचा सामना करणाऱ्या भारताला वर्ल्ड बँकेकडून दिलासा; केली मोठ्या मदतीची घोषणा

-मुंबईवरुन लपूनछपून आलेल्या जावयाचा कोरोनामुळे मृत्यू; पारनेरचे 200 जण क्वारंटाईन