Uncategorized

शेण आणि गोमूत्रामुळे कोरोना रोखता येवू शकतो; भाजप आमदाराचा अजब दावा

नवी दिल्ली | जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसचे संशयित रुग्ण आता भारतात सापडले आहेत. भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाली आहे. कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी भाजपच्या आमदार सुमन हरिप्रिया यांनी अजब दावा केला आहे.

शेण आणि गोमूत्रामुळे कोरोना रोखता येऊ शकतो, असा अजब दावा सुमन हरिप्रिया यांनी केला आहे. शेण आणि गोमूत्रामुळे कर्करोगासारखे अनेक आजार बरे झाले असल्याचाही दावा सुमन यांनी केला आहे.

आपण जर आयुर्वेदिक औषध गायीच्या गोवऱ्यामध्ये घातली आणि ती जाळली, तर त्याच्या धुराने किमान 5 ते 10 किलोमीटरचा परिसर शुद्ध आणि निर्जंतुक होऊन जातो. त्यामुळे आपण कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी याचा वापर केला तर कोरोना नक्कीच बरा होऊल असा माझा विश्वास आहे, असा आत्मविश्वास सुमन हरिप्रिया यांनी व्यक्त केला आहे.

कोरोना या विषाणूपासून वाचण्यासाठी आणखी कोणतीही लस किंवा औषध नाही. वर्ल्ड हेल्थ ऑरगनाएझेशनही कोरोनावर औषध कसं शोधायचं याचं संम्रभात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-हिंमत असेल तर सांगाच, आम्ही मुस्लिमांना आरक्षण देवू शकत नाही- देवेंद्र फडणवीस

-बौद्ध समाजावर टीका करत अभिनेत्री केतकी चितळेनं फोडलं नव्या वादाला तोंड!

-“सोशल मीडिया अकाउंटवर विदुषकी खेळ खेळून भारताचा वेळ वाया घालवणं बंद करा”

-मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित पार पडणार फडणवीसांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

-अहमदनगरच्या आरोपींना मोक्का लावा; तृप्ती देसाई आक्रमक