खडसे, बावनकुळे, पंकजा मुंडें यांना भाजपचा पुन्हा दे धक्का; विधानपरिषदेची उमेदवारी नाही?

मुंबई |  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विधानसभा निवडणुकीत बंधूंकडून पराभूत झालेल्या पंकजा मुंडे आणि विधानसभेचे तिकीट नाकारलेले माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पदरी पुन्हा निराशा पडण्याची शक्यता आहे. या तिन्ही नेत्यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळेल, अशी चर्चा असतानाच भाजपने मात्र वेगळ्याच नावांचा विचार केलेला दिसून येत आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात निवडणुकीला उभे ठाकलेले गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे. तसंच पडळकर यांच्याबरोबर रणजितसिंह मोहिते पाटील यांना देखील उमेदवारीची लॉटरी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चारच दिवसांपूर्वी खडसे यांनी आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी इच्छा बोलून दाखवली होती. तर पंकजा मुंडे यांनी कागदपत्रांपासून उमेदवारीसाठी लागणारी सगळी तयारी सुरू केली होती. दुसरीकडे बावनकुळेंनी थेट उमेदवारीविषयी बोलण्याचं टाळलं होतं. मात्र त्यांनाही उमेदवारी मिळेल, अशी आशा होती.

दरम्यान, भाजपने जर या तिन्ही नेत्यांपैकी उमेदवारी दिली नाही आणि नव्याने पक्षात आलेल्या नेत्यांना उमेदवारी दिली तर पुन्हा एकदा ज्येष्ठांना मान न देता आयारामांसाठी पायघड्या घालणारा भाजप म्हणून विरोधी पक्ष त्याचबरोबर लोक त्यांच्यावर टीका करण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता दारु प्रेमींना मिळणार घरपोच दारु; झोमॅटो देणार होम डिलिव्हरी

-सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितल्या ‘या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यक्षमतेवरच देवेंद्र फडणवीस यांचं प्रश्नचिन्ह

-मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टोचले सरकारचे कान

-परप्रांतीय गावी गेल्याने उपलब्ध रोजगार स्थानिकांना द्या; राज ठाकरेंची मागणी