उदयनराजेंचं राजकीय भविष्य भाजपने ठरवलं; घेतला हा मोठा निर्णय…

मुंबई |  सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर नव्याने भाजपात आलेल्या उदयनराजेंना पक्ष काय संधी देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजेंचा 5 महिन्यांचा वनवास संपला आहे. भाजपने त्यांना राज्यसभेची उमेदवारी घोषित केली आहे.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते श्रीनिवास पाटील यांनी उदयनराजेंचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. तेव्हापासून उदयनराजे राजकारणातून जरा बाजूला पडले होते. मात्र आता राज्यसभेच्या रूपाने ते पुन्हा राजकारणात सक्रिय झालेले दिसून येणार आहेत.

उदयनराजे यांच्याबरोबर महाराष्ट्रातून रिपाइं नेते आणि केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनाही भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, तिसऱ्या जागेसाठी आम्ही एकनाथ खडसे यांच्या नावासाठी आग्रही आहोत, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

-धक्कादायक! पुण्यात कोरोनाग्रस्त कुटुंबाला वाळीत टाकल्याचा प्रकार उघड

-मध्य प्रदेश प्रकरणाने उकळ्या फुटल्या तर पाकळ्या गळून पडतील – अमोल मिटकरी

-शरद पवार पुन्हा राज्यसभेच्या आखाड्यात… राज्यसभेसाठी अर्ज दाखल

-“कोरोना आला तर हजारोंनी मास्क घेतले… अपघाताने रोज 600 मरतात तरी हेल्मेट का घेत नाही”

-काँग्रेसवर हल्लाबोल करणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदेना पवारांचं जोरदार प्रत्युत्तर