ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली |  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाची लक्षणं दिसत असल्याने आपण स्वत:ला विलगीकरणात ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

गेल्या 24 तासांपासून मला काही हलकी लक्षणं जाणवत होती. तपासणी केली असता पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे. मी सध्या विलगीकरणात आहे, असं त्यांंनी ट्विट करून सांगितलं आहे.

आपण सध्या करोना व्हायरसशी लढा देत असून मी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सरकारचं नेतृत्त करत राहणार आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ब्रिटिश राजघराण्याचे प्रिन्स चार्ल्स यांनाही कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. आता ब्रिटनच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण झाल्याने गांभीर्य अधिकच वाढलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या –

-राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीडशे पार; आज एकाच दिवशी 28 रूग्णांची नोंद

-बारामतीच्या काटेवाडीत युवकांनी खाकी वर्दीवरच टाकला हात, ‘या’ कारणामुळे स्टम्पनं मारलं

-पहिला देश, बाकी सारं नंतर; रोहित शर्माचं अभिमान वाटावं असं उत्तर

-‘बाहुबली’चा देशासाठी मदतीचा हात; 4 कोटींची केली मदत

-कोरोनाच्या संकटात देव धावले मदतीला, साईबाबा आणि अंबाबाई मंदिराची सरकारला भरघोस मदत