चीनसोबतच्या वादानंतरही ‘इतक्या’ टक्के लोकांना नरेंद्र मोदींवर विश्वास!

दिल्ली |  गलवान खोऱ्यात भारतीय सैनिकांवर चीननं भ्याड हल्ला केला. देशभरात या घटनेनंतर तीव्र संतापाची लाट उसळली. विरोधकांकडून सरकारवर टीकाही करण्यात आली. सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणांवरही विरोधकांनी बोट दाखवलं. मात्र ७३ टक्के भारतीयांचा अद्याप मोदीजींच्या सुरक्षा धोरणावर विश्वास असल्याचं नुकतंच एका सर्वेतून समोर आलं आहे.

”सी व्होटर’ या संस्थेच्या वतीनं मोदी सरकारच्या राष्ट्रीय सुरक्षा धोरणावर जनतेची मत घेण्यात आली. यादरम्यान केंद्र सरकार चीनसोबतचा संघर्ष हाताळण्यात सक्षम असल्याचं ७३.६ टक्के नागरिकांचं म्हणणं असल्याचं समोर आलं आहे.

मात्र २० जवान शहिद झाल्यावर मोदींनी चीनला ठोस उत्तर दिलं का? हा प्रश्न विचारला असता ६० टक्के लोकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. यावरून लोकांची सरकारवरची नाराजीही समोर आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी व काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्धल नागरिकांचा कलही तपासण्यात आल्या. नरेंद्र मोदींचा प्रभाव अजूनही कायम असल्याचं सर्वेतून समोरं आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-काँग्रेसची धुरा पुन्हा राहुल गांधींच्या हाती?, कार्यकारिणीच्या बैठकीत मागणी

-रामदेव बाबांना मोठा धक्का; ‘त्या’ औषधाबाबत आयुष मंत्रालयाचे महत्त्वाचे आदेश

-गांधीहत्येचे समर्थन करणाऱ्या व्यक्तीवर गांधीवादी लोकांचे आभार मानण्याची वेळ आली!

-आमच्या औषधाने फक्त तीनच दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होणार; बाबा रामदेव यांचा दावा

-जगातील अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविचला कोरोनाची लागण