“उद्धवजी, मुख्यमंत्रीपद संभाळणं तुमचं काम नाही”

मुंबई | मुख्यमंत्रिपद हा उद्धव ठाकरेंचा रोल नाही. त्यांनी संघटना सांभाळावी आणि मुख्यमंत्रिपद हे वर्षानुवर्ष जे आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत अशा कोणाला तरी द्यायला हवं होतं, अशी विखारी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेंचं कामच नाही. कारण त्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, एकदा आमदार, दोनदा आमदार असं करत करत सर्व शिकावं लागतं. सर्व छक्के-पंजे शिकावे लागतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे सरळ आहेत, प्रेमळ आहेत. पण सरकार चालवण्याचं कौशल्य त्यांनी मिळवलंय असं वाटत नाही. ते कोणतेही उत्तर परिपूर्ण देत नाहीत, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपने सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या-

-वॉटरग्रीड प्रकल्पाला फक्त 200 कोटी रुपये देऊन मराठवाड्याची चेष्टा- देवेंद्र फडणवीस

-“अरे बाबांनो, मी अन् मुख्यमंत्री शब्दांचे पक्के आहोत विरोधकांसारखा आम्ही शब्दांचा खेळ करत नाही”

-उद्धव ठाकरे आज करणार रामजन्मभूमीत प्रवेश; असा असणार अयोध्या दौरा

-नाथाभाऊंची नाराजी दूर करण्यासाठी भाजप घेणार ‘हा’ मोठा निर्णय

-अखेर ग्रामपंचायत सदस्यामधूनच होणार सरपंचाची निवड; राज्यपालांनी केली स्वाक्षरी