Top news पुणे महाराष्ट्र

कोरोनामुळे 400 वर्षांची परंपरा असलेली विठ्ठलाची ‘ही’ वारी रद्द, महाराज मंडळींचा मोठा निर्णय

पंढरपूर | चार प्रमुख वाऱ्यापैकी असलेली चैत्री वारीच्या येत्या 4 एप्रिलला संपन्न होणार होती, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्रीचा हा सोहळा रद्द करण्यात आला आहे. वारकरी संप्रदाय पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हभप देवव्रत महाराज वासकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या  बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

देशावर सध्या कोरोनाचं संकट आलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी संचारबंदी पुकारली आहे. जनतेच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला साथ देण्यासाठी चैत्री वारी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

वारीची परंपरा खंडीत होते आहे हे कारण काढून कोणीही पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करु नये. चैत्री वारीला तीन ते चार लाख वारकरी भाविकांची उपस्थिती असते. वारी रद्द केल्याने कोरोनाला लगाम बसणार आहे.

वारीला चारशे वर्षाची परंपरा आहे वारी रद्द होण्याचा पहिलाच प्रसंग आहे. वारीची परंपरा स्थानिक महाराज मंडळी रुढीनुसार पार पाडतील. जे नियमाचे वारकरी आहेत त्यांना आपल्या घरातच व्रतवैकल्य करुन श्री. विठ्ठल-रखुमाईचे पूजन करावे. पंढरपूरला येण्याचा अट्टाहास करुन नये. कोरोनामुळे सध्या श्री. विठ्ठल मंदिर बंद आहे, तेव्हा वारकऱ्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन तमाम वारकरी मंडळींना केले आहे.

महत्वाच्या बातम्या –

कोरोनाचा सामना करण्यासाठी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

कोरोनाच्या संकटात पंतप्रधान मोदींच्या 7 मोठ्या घोषणा

-आज महाराज असते तर त्यांनी माझा लढवय्या स्त्री म्हणून सन्मान केला असता- तृप्ती देसाई

-“मी मराठ्यांची लेक आणि सून; माझी बदनामी करणारे 80 टक्के तरुण मराठाच”

-लोकांनो कृपया गर्दी करू नका, आता सगळं व्यवस्थित होईल; मंत्री बाळासाहेब थोरातांना विश्वास