Loading...
देश

दिल्ली निवडणुकीत काँग्रेसने मॅचफिक्सिंग केली आहे; चंद्रकांत पाटलांना संशय

मुंबई |  दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांनी दणदणीत विजय मिळवत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. 70 जागांपैकी आप 60 जागांवर आघाडीवर आहे. मात्र दिल्ली निवडणुकीत काँग्रेसने मॅचफिक्सिंग केली आहे, असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

जर त्यांच्या सगळ्यांच्यात हिम्मत असेल तर भाजपसमोर वेगवेगळं लढा, असं आव्हान पाटील यांनी प्रादेशिक पक्षांना दिलं आहे. निवडणुका या अशा असतात की प्रत्येक पक्षाने यामध्ये ताकद लावायची असते. दिल्लीचं क्लिअर विश्लेषण असं आहे की भाजपला देशभर एकटं पाडण्यासाठी अनेक पक्ष एकत्र येत आहेत. त्यांना माझं आव्हान आहे की हिम्मत असेल तर भाजपसमोर वेगवेगळं लढा, असं पाटील म्हणाले.

Loading...

काँग्रेसने आम आदमी पक्षाकडे व्होटबँक ट्रान्सफर केली, असा आरोप करत काँग्रेसने मॅचफिक्सिंग केली आहे, असं पाटील म्हणाले आहेत. तर आमच्या गेल्यावेळी 3 जागा निवडून आल्या होत्या आता 4 जरी आल्या तरी आमचा विजय आहे, असंही पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या या आरोपाला आता काँग्रेस काय उत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-दिल्लीत भाजपला पराभव अन् आपच्या विजयानंतर शरद पवार यांचं ट्वीट; म्हणतात…

-दिल्लीत काँग्रेसला शरद पवार मिळाले नाहीत??; रोहित पवार म्हणाले….

-दिल्लीत सुफडासाफ झाल्यानंतर रोहित पवार यांचा काँग्रेसला सल्ला; म्हणाले…

-इथं द्वेषाचं राजकारण होणार नाही… आज प्रेम जिंकलं; दिल्ली विजयानंतर आपची प्रतिक्रिया

-“भाजपच्या पदरी अपयश…. मात्र 2024 लोकसभेला दिल्ली मोदींंच्याच पाठीशी उभी राहिल”

Loading...