Loading...
महाराष्ट्र मुंबई

छ. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात लालसी सरकारने आमच्या भगिनींची सुरक्षा वाऱ्यावर सोडली- चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्यात सातत्याने सुरू असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनेवरून भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात सध्या चाललंय तरी काय? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

सत्ता लालसी सरकारने आज आमच्या माता-भगिनींची सुरक्षा अक्षरशः वार्‍यावर सोडली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आज महिला सुरक्षित नाहीत हे किती मोठं दुर्दैव, असल्याची घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर केली आहे.

Loading...

हिंगणघाटमध्ये प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न होतो. औरंगाबादमधील सिल्लोडमध्ये एका महिलेला जिवंत जाळलं जातं. पनवेलमध्येही असाच प्रकार घडतो. काल पुण्यात सिनेअभिनेत्री मानसी नाईकची छेड काढली जाते, असंही पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था आहे का नाही?, असा सवालही चंद्रकांत पाटलांनी सरकारला केला आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

-उद्धवजी, शेतकऱ्यांच्या बांधावर गेल्यावरच कळेल किती आक्रोश आहे- राजू शेट्टी

Loading...

-“शरद पवार सिर्फ नामही काफी है. महाराष्ट्राचा हा नेता जेव्हा दिल्लीत उभा राहतो तेव्हा दिल्लीलाही झुकावं लागतं”

-चितळे उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा काकासाहेब चितळे काळाच्या पडद्याआड

-कसाबला फासावर पोहोचवणाऱ्या उज्ज्वल निकम यांच्यावर बायोपिक

-“दांडी मार्च ते दंडा मार! काँग्रेसने चांगलीच प्रगती केली”

Loading...