इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन नाही पण त्यांच्या पाठीशी- चंद्रकांत पाटील

मुंबई | इंदुरीकर महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून आता राजकारणाला सुरूवात झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी इंदुरीकर महाराजांच्या वक्तव्याचं समर्थन करत नाही पण आम्ही त्यांच्या पाठीशी असल्याचं ते म्हणाले आहेत.

इंदुरीकर महाराजांनी महिलांबद्दल तसं वक्तव्य करायला नको होतं. त्यांची महिन्याला 80 प्रवचनं होतात. ती सगळी जनप्रबोधनाची असतात, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे त्यांनी महाराजांचे गोडवे गायले आहेत.

अत्यंत मार्मिकपणे समाजातील चुकांंवर ते बोट ठेवत असतात. मी त्यांच्या अनेक किर्तनांना गेलो आहे. इंदुरीकर महाराजांची कीर्तनं समाज प्रबोधनासाठी असतात. परंतू त्यांनी महिलांबाबत केलेलं आताचं वक्तव्य चुकीचं आहे, असं पाटील म्हणाले आहेत.

दुसरीकडे वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव आहे. त्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीवाले इंदुरीकर महाराजांवर टीका करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-वारकरी सांप्रदाय संपवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीचा डाव; इंदुरीकरांच्या समर्थनार्थ भाजप मैदानात

-इंदुरीकर महाराजांनी लिहिलं आपल्या लाखो चाहत्यांना पत्र; पत्रात म्हणतात…

-“शरद पवार हे मागासवर्गीय आणि आदिवासींच्या विरोधात आहेत”

-भाजपच्या मंचावरून मी शरद पवारांना चॅलेंज देतो की….- देवेंद्र फडणवीस

मला विश्वास आहे, आबांचं काम रोहित पुढे घेऊन जाणारच- इंदुरीकर महाराज