Top news पुणे महाराष्ट्र

…म्हणून रणजितसिंह मोहितेंना तिकीट दिलं; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण

ranjitsingh mohite

पुणे |   भाजपने विधान परिषदेसाठी आपल्या 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामध्ये गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली आहे. जेष्ठ नेत्यांना तिकीट का नाही मिळालं त्याचसोबत नव्यांना संधी मिळण्याचं नेमकं काय कारण आहे, याची चर्चा सध्या सुरू आहे. अशातच रणजितसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी का मिळाली, याचं कारण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत टक्कर घेतली होती. ते कोणत्याही आमिषाला आणि दबावाला बळी पडले नाहीत. जर त्यांना तिकीट दिलं नसतं तर त्यांच्यावर अन्याय झाला असता, अशा शब्दात पाटील यांनी रणजितसिंह यांच्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे.

माढा जिंकणं तितकसं सोपं नव्हतं. या कामात मोहिते पाटील पिता-पुत्रांचं मोठं योगदान आहे. मोहिते पाटील यांच्यामुळेच आम्ही माढा लोकसभा, माळशिरस विधानसभा तसंच सोलापूर जिल्ह्यात सत्ता राखू शकलो. आम्ही तिथे भाजपचा पाय रोवून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं नाक कापलं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दुसरीकडे एकनाथ खडसे यांच्या पक्षावरील आरोपांना उत्तर देताना खडसे यांनाच उलटप्रश्न विचारले. पक्षाने तुम्हाला आणखी किती द्यायचं. तुम्हाला सात वेळा उमेदवारी, मुलाला उमेदवारी, पत्नीला महानंदाच्या अध्यक्षा, मुलीला विधानसभेची उमेदवारी तसंच सूनेला खासदारकी… आता पक्षाने द्यायचं तरी किती? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“२ दिवसात पंकजा मुंडेंनी चांगला अभ्यास केला, मला आणि इतरांना तो जमला नाही”

-…त्यासाठी दहशत निर्माण करणाऱ्या ईडी, सीबीआयसारख्या राजकीय संस्थांचे लॉकडाऊन करा- संजय राऊत

-कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही; जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती

-काळा पैसा भारतात आणण्याची मोदींना संधी; शिवसेनेचा सल्लावजा टोला

-पक्षासाठी खडसेंचं योगदान मोठं, त्यांच्यावर अशी वेळ येणं दुर्भाग्यपूर्ण- नितीन गडकरी