सातारा | महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपलीये. त्याच पार्श्वभूमीवर आत्तापासूनच राजकीय बाण एकमेकांवर सोडले जातायेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजपाची पुन्हा एकदा सत्ता येणार, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य जनता भाजपच्या हातात पुन्हा एकदा सत्ता देणार हा विश्वास व्यक्त करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार नाही असं म्हणणारा आंधळा बहिरा किंवा मंदबुद्धीचा ठरेल. राज्यात सध्याची परिस्थिती पाहता भाजप निर्विवाद बहुमत मिळवेल.
साताऱ्याच्या खंडाळ्यात चंद्रकांत पाटील एका कार्यक्रमाच्या निमित्त आले होते. यावेळी त्यांनी आगामी राजकीय समीकरणांवर आणि परिस्थितीवर भाष्य केलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून मला उदयनराजे यांच्याबद्दल आदर आहे. त्यांच्याऐवजी सातारा लोकसभेला दुसरा उमेदवार असता तर साताऱ्यातसुद्धा परिवर्तन पाहायला मिळाले असते, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, दोन महिन्यांपासून काँग्रेस अध्यक्ष शोधते आहे. पण त्यांना अध्यक्षच मिळेना, असा निशाणाही त्यांनी काँग्रेसवर साधला.