उद्धव ठाकरे यांनी ग्लोज, पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

मुंबई |  राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला ठाकरे सरकारला जबाबदार धरत भाजपने आज महाराष्ट्र बचाव आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनात भाजप उद्धव ठाकरेंना प्रमुख लक्ष्य करत आहेत. त्या दृष्टीने भाजपने तयारी देखील केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ग्लोज,पीपीई किट घालून ‘मातोश्री‘बाहेर पडावे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

राज्यभरातील भाजप कार्यकर्ते व नागरिक घराबाहेर फलक, काळे झेंडे फडकवतील, काळ्या फिती लावतील आणि सरकारचा निषेध करीत निदर्शने करतील, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

जनतेसाठी प्रभावीपणे काम करण्यास सरकारला भाग पाडावे, यासाठी महाराष्ट्र बचाव आंदोलन असल्याचं पाटील यांनी सांगितलं. तसंच केंद्राप्रमाणेच राज्य सरकारनेही शेतकरी, मजूर, कामगार, बारा बलुतेदार व इतर अडचणीत आलेल्यांसाठी मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी आमची प्रमुख मागणी असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

दरम्यान, आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपच्या मेरा आंगण मेरा रणांगण या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आली आहे. ज्यांना जनतेने सत्तेच्या अंगणातून बाहेर काढलं ते मेरा आंगण मेरा रणांगण आंदोलन करत आहेत, अशा शब्दात राऊत यांनी टोला लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच नवविवाहिता कोरोना पॉझिटिव्ह; नवऱ्यासह 32 जण क्वारंटाइन

-“सुरतमध्ये मजुरांच्या असंतोषाचा भडका, भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा”

-आत्तापर्यंत 30 लाख मजूर स्पेशल ट्रेन्सनी आपापल्या घरी पोहोचवले- पीयूष गोयल

-कोरोनामुळे लग्नाच्या खर्चात बचत; शेतकरीपुत्राची अनाथ मुलांच्या माहेर संस्थेला आर्थिक मदत

-काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप