शिवसेनेबरोबर आता जुळणं कठीण- चंद्रकांत पाटील

मुंबई | महाआघाडी सरकार भाजप नेत्यांशी सूडबुद्धीने, द्वेषभावनेतून वागत असून शिवसेनेबरोबर पुन्हा लगेच सूर जुळणे कठीण आहे. महाआघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजप करणार नाही, आम्हाला त्यात रस नाही. ते आपापसातील मतभेदांमुळेच पडेल, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

तीन पक्षाचं महाआघाडी सरकार भिन्न विचारांचं असून अनेक विषयांवर मतभेद होत असल्याचे दिसून येत आहे. सरकारमधील मतभेद वाढत जातील आणि विसंवादातून हे सरकार पडेल. त्यासाठी आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.

राजकारणात कटुता, राग फार काळ टिकत नाही. पुन्हा शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सत्तास्थापनेपेक्षा मध्यावधी निवडणुकांचाच पर्याय योग्य राहील, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, भाजप आता मध्यावधी निवडणुकांसाठीच तयारी सुरू करणार असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-इंदुरीकरांची जीभ पुन्हा घसरली; शिक्षकी पेशाची खिल्ली उडविणारा व्हिडीओ व्हारयल!

-अरविंद सावंतांना लॉटरी; मिळाला मंत्रिपदाचा दर्जा!

-शपथविधी सोहळ्यासाठी केजरीवालांनी दिली मोदींना आमंत्रणाची हाक!

-कार्यकर्त्यांनो थोडं दमांनं घ्या; …नाहीतर बायको मला घरातून हाकलून देईल- अजित पवार

-व्हॅलेंटाईन डेला अशोक चव्हाण रंगले प्रेमरंगात; ‘मेरे सपनो की राणी कब आयेगी तू’ हे गायलं गाणं