महाराष्ट्र मुंबई

मला शरद पवारांवर पीएचडी करायचीय- चंद्रकांत पाटील

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. पण तरीही त्यांचा पक्ष 10 पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र तरीही ते राजकारणात कायम केंद्रस्थानी असतात. त्यामुळे मला त्यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

शरद पवार एकाच वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांचं म्हणणं कसं काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची असल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे.

देशात आणि राज्यात भाजपला एकट पाडण्याचं काम चालू आहे. ते आव्हान आमच्या समोर असून येणार्‍या सर्व निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार आहे. पुन्हा त्याच दिमाखात उभे राहू असाही निर्धार पाटलांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांना मागील अनेक वर्षांपासून ओळखत असून त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यांना विरोध पत्करण्याची सवय नसल्याचंही पाटलांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-बास की आता उद्धवजी, सत्तेसाठी अजून किती लाचार व्हाल?- देवेंद्र फडणवीस

-इंदूरीकर महाराजांना आणखी एक जबर धक्का!

-… तर उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांचं नक्की जमेल- शरद पवार

-औरंगाबाद दौऱ्यावर जाण्यापूर्वी राज ठाकरेंनी घेतले शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरेंचे आशिर्वाद!

-भाजपमध्ये नेतृत्वाची दहशत आणि नेत्यांमध्ये घुसमट- शरद पवार