‘हे तर पवारांनी मान्य केलं’; चंद्रकांत पाटलांचं शरद पवारांना प्रत्युत्तर

मुंबई | महाविकास आघाडी सरकावर सातत्याने टीका करण्यात येत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. आघाडी सरकार हे सर्कशीप्रमाणे काम करत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. यावरून पवारांनी भाजपला चांगलंच सुनावलं होतं.

आमच्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत, पण विदुषकाची मात्र कमतरता आहे, असं म्हणत पवारांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं होतं. पवारांच्या याच टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे हे शरद पवारांनी मान्य केलं आणि त्या सर्कसमध्ये सर्व प्राणी आहेत हे देखिल मान्य केलं आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान, तीन महिने घरात बसलेल्या मुख्यमंत्र्यांना बाहेर पडावं असं वाटलं तर दुसरीकडे आता चार दिवसांनंतर शरद पवार यांनाही कोकण दौरा करावासा वाटतोय, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात रस्त्यावर पचकन थुंकला… अशी कारवाई झाली की त्याला चांगलीच अद्दल घडली!

-दिलासादायक! गेल्या 48 तासांत एकाही पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली नाही

-झुंज अपयशी… राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनाने घेतला बळी!

-कोरोनामुळे पहिल्यांदाच आमदाराचा बळी; वाढदिवसालाच ‘या’ आमदाराचा मृत्यू!

-उद्धव आणि आदित्य यांचा मला पाठिंबा, म्हणाले कसलीही मदत करायला तयार आहे- सोनू सूद