अजित पवारांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांचे प्रत्युत्तर; म्हणाले, येवढा अकांडतांडव…

मुंबई | कोरोनाच्या संकटादरम्यान निर्बंधात गेलेला दहीहंडीचा उत्सव आनंदात साजरा झाला. त्यानंतर आता गोविंदांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या पाच टक्के आरक्षणाच्या घोषणेवर वाद निर्माण झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोविंदापथकातील गोविंदांसाठी सरकारी नोकरीत खेळाडू कोट्यातून पाच टक्के आरक्षणाची घोषणा केली. त्यामुळे आता त्यांची ही घोषणा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदेंना खडे बोल सुनावले आहेत. तुमच्या मनात आले आणि तुम्ही भावनेच्या भरात निर्णय घेतला, असे होत नाही, असे अजित पवार म्हणाले.

कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेऊन चालत नाही. त्याचा दोनही सकारात्मक आणि नकारात्मक अंगाने विचार केला पाहिजे. उद्या गोविंदांपैकी कोणी जर दहावी नापास असेल, तर त्याला कोणती नोकरी देणार आहात, असा प्रश्न अजित पवारांनी विचारला.

त्यावर आता आपल्या मुख्यमंत्र्यांची पाठराखण करत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. खेळांच्या यादीत आणखी एक खेळ जोडला गेला, असे पाटील म्हणाले.

अजित पवार येवढा आकांड तांडव का करत आहेत, खेळांच्या यादीत आणखी एक खेळ जोडला गेला आहे. बाकी काही झाले नाही. त्यामुळे आरक्षण नव्याने दिलेले नाही. खेळाडूंसाठी असणाऱ्या राखीव आरक्षणांत त्यांचा सामावेश केला आहे, असे पाटील म्हणाले.

दहीहंडीला खेळाचा दर्जा देऊन त्या खेळाला साहसी खेळाच्या यादीत टाकले आहे. आणि गोविंदांना आरक्षण दिले आहे. त्यात आरडाओरडा करण्याचे कारण नाही, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या – 

बिल्कीस बानो प्रकरणात गीतकार जावेद अख्तर आक्रमक, दिली संतप्त प्रतिक्रिया

मुंबईवर पुन्हा 26/11 चे सावट? वाचा सविस्तर वृत्त

‘तुमच्या मनात येईल ते…’, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर अजित पवारांनी सुनावले खडे बोल

‘हल्ला केला त्याच ठिकाणी सभा घेणार, दम असेल तर…’ सामंताचा हल्लेखोरांना इशारा

‘केंद्रीय निवडणूक समितीतून गडकरींना वगळल्याने स्वामींकडून भाजपला घरचा आहेर’