छत्रपतींवर मुस्लीम मावळ्यांनी केलेला टीकटॉक व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल!

मुंबई | देशातील तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच वेड लावणाऱ्या टीकटॉक अ‌ॅपवर अनेक जण काही सेकंदाचा व्हिडीओ तयार करत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप व्हायरल होतात. गेल्या काही दिवसांपूर्वी एका मुलीचा व्हिडीओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत होता. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती असल्या कारणाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकांच्या व्हॉट्स अ‌ॅप स्टेटसवर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये खास कारण आहे 4 मुस्लिम मुलं आणि एक मुस्लिम मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन येताना दिसत आहेत.

4 मुलं आणि 1 मुलीचा व्हायरल झालेल्या व्हिडीओला ‘तानाजी’ चित्रपटाचं म्युझिक वापरण्या आलं आहे. हा व्हिडीओ जोया या नावाने टिकटॉक अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, हा व्हिडीओ शिवजयंती असल्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शिवप्रेमींचा या व्हिडीओवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-कीर्तन म्हणजे करमणूक समजलात काय?; तुकाबांचे वंशज डॉ. सदानंद मोरे संतापले

-मी बोलवतीय, तुमच्यात हिंमत असेत तर…; तृप्ती देसाईंच इंदोरीकरांना आव्हान

-कोरेगाव-भीमा मध्ये अनावश्यक वातावरण निर्मिती करण्याला संभाजी भिडेच कारणीभूत- शरद पवार

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”

-“मीडियाने माझ्या बोलण्याचा विपर्यास केला… मनं दुखावली असतील तर दिलगिरी व्यक्त करतो”