महाराष्ट्र मुंबई

राज्यात जून महिन्यात आतापर्यंत जवळपास 29 लाख थाळ्यांचं वाटप, भुजबळांची माहिती

मुंबई | राज्यातील 52 हजार 440 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जून ते 28 जूनपर्यंत राज्यातील 1 कोटी 43 लाख 20 हजार 110 शिधापत्रिका धारकांना 62 लाख 22 हजार 430 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले तसेच 28 लाख 85 हजार 745 शिवभोजन  थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे ७ कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार 440 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 19 लाख 55 हजार 947 क्विंटल गहू, 14 लाख 97 हजार 508 क्विंटल तांदूळ, तर 20 हजार 711 क्विंटल साखरेचे  वाटप करण्यात आले आहे.

त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 56 हजार 259 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलिटी यंत्रणेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने ५ किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जून पासून एकूण 1 कोटी 2 लाख 30 हजार 648 रेशनकार्डला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 4 कोटी 63 लाख 93 हजार 273 लोकसंख्येला 23 लाख 19 हजार 660 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं

-कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी….., नवाब मलिक यांची महत्त्वाची माहिती

-औषधोपचारात महाराष्ट्र जगाच्या बरोबरीने उभा, काही औषधे मोफत देण्याचा सरकारचा विचार- मुख्यमंत्री

-‘या माझ्या महाराष्ट्रात गुंतवणूक करा!’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गुंतवणूकदारांना साद

-तुम्ही उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडकडे लक्ष दिलं तरी मुंबई-पुण्याची गर्दी कमी होईल, गडकरींना कानपिचक्या