Top news महाराष्ट्र मुंबई

मजुरांचे जथ्येच्या जथ्ये सरकारला अशोभणीय; लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर भुजबळ यांची नाराजी

मुंबई | देशात तसंच महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात अनेक मजूर राज्यातल्या विविध भागात अडकले आहेत. गाड्या सुरू होण्याची कोणतीही चिन्ह सध्या दिसत नाहीत. अशा परिस्थितीत घरात खायला देखील काही उरलं नाही. मग आपल्या लेकराबाळांना आणि बायकापोरांना घेऊन मजुरांचे जथ्येच्या जथ्ये रस्त्याने निघाले आहेत. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून या मजुरांना गावाकडे पोहचण्याचा ध्यास आहे. या सगळ्या मन विषण्ण करणाऱ्या परिस्थितीवर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे.

स्थलांतरितांचे जथ्येच्या जथ्ये रोडवरून गावाकडे जायला निघाले आहेत, हे सरकारला अशोभणीय आहे, असं परखड मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. तसंच त्यांनी लॉकडाऊनच्या सरकारी उपाययोजनांवर नाराजी दर्शवली आहे.

मजुरांचे घोळके ज्यावेळी रस्त्याने चालत आहेत, ते चित्र मला बघवत नाही. मन अगदी विषण्ण होऊन जातं. या विषयाला मी कॅबीनेट बैठकीत वाचा फोडली आहे. यावर लवकरात लवकर पावलं उचलली जावीत, यासंबंधी चर्चा  झाली असल्याचं भुजबळांनी सांगितलं.

सरकार सतत बदलत असलेल्या नियमांमुळे लोकांमध्ये संभ्रम होत आहे. हा संभ्रम दूर करणे हे आमच्या सगळ्यांचं काम आहे. सरकार आणि प्रशासनामध्ये योग्य संवाद करून येणाऱ्या काळात नागरिकांमध्ये संभ्रम होणार नाही, याची काळजी घेतली जाईल, असा शब्दही भुजबळ यांनी दिला.

दरम्यान, संकटाच्या काळात सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे. मला कुणावरही टीका करायची नाही. माझा टीकेचा हेतू नाही परंतू सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, अस ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-दारूच्या 65 कोटी महसुलाच्या बदल्यात 65 हजार कोरोना संक्रमण विकत घेणं परवडणारं नाही- संजय राऊत

-“…तर देशात पुन्हा लॉकडाऊन करावं लागेल”

-अतिश्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीवर 2 टक्के कोरोना कर लावा; देशातल्या विचारवंतांची मागणी

-आजच्या संकटातून मात करण्याची प्रेरणा आपण बुद्धांकडून घेऊ शकतो- मु्ख्यमंत्री उद्धव ठाकरे

-‘राज’पुत्राचा मुख्यमंत्र्यांना फोन; उद्धव यांचा देखील सकारात्मक प्रतिसाद