Top news महाराष्ट्र मुंबई राजकारण

उच्च न्यायालयाने फटकारल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना पळ काढला; नेमके काय म्हणाले शिंदे?

eknath shinde1 e1657105167747
Photo Credit- Facebook/Eknath Shinde

मुंबई | दादरच्या शिवाजी पार्क (Shivaji Park) मैदानावर शिवसेना पक्षाचा पूर्वनियोजित दसरा मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज मुंबई महापालिकेेने अर्ज फेटाळला होता. तो निर्णय अवैध असल्याचे न्यायालयाने ठरविले.

मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) महापालिकेला फटकारत शिवसेनेला परवानगी दिली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाने केेलेला अर्ज फेटाळण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेने आपल्या अधिकारांचा दुरुपयोग केला असल्याचे निरीक्षण न्यायालयाने यावेळी नोंदविले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या नि:पक्ष कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

एकनाथ शिंदे यांना हा मोठा फटका मानला जात आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे काल रात्री उशिरा ठाण्यावरुन मुंबईला रवाना होत होते. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी गाठले होते, पण त्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.

हा निर्णय शुक्रवारी दुपारी घेण्यात आला. त्यानंतर शिवसेनेत एकच जल्लोष साजरा करण्यात आला. शिवसेनेच्या समर्थकांनी फटाके फोडत आणि गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.

उपमुख्यमंत्री देवंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि इतर मान्यवर नेत्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिल्या. मात्र एकनाथ शिंदे यांनी पळ काढला.

महत्वाच्या बातम्या –

शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मेळावा; राज ठाकरे म्हणाले, मैदानाचा वारसा…

अमित शहांची लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमारांवर मोठी टीका; म्हणाले, लालूजींनी आयुष्यभर…

न्यायालयाने फटकारल्यावर शिंदे यांच्या गटाकडून पहिली प्रतिक्रिया; दादा भुसे म्हणाले…

नवनीत राणांना लवकरच अटक होणार, न्यायालयाने बजावले अजामीनपात्र वॉरंट

शिवसेनेचा दसरा मेळाव्याचा वाद निकालात; शिवाजी पार्कवर कोण घेणार, ‘दसरा मेळावा’?