क्राईम महाराष्ट्र मुंबई

जुन्या रागाचा पारा चढला एवढा, मामीनेच बादलीत बुडवला चार वर्षाचा चिमुकला

मुंबई- माणसाचा राग त्याची माती करतो. राग आणि भीक माग असही आपण म्हणतो तरीही तो राग आपली पाठ सोडत नाही. आणि याच रागाच्या भरात आपण काय करतोय याचही भान आपनाला रहात नाही. असच एका जुन्या वादाचा राग मनात ठेवून एका बाईने चक्क चार वर्षाच्या चिमुरड्याला बादलीत बुडवून मारल्याचा कीळसवाना प्रकार मुंबईत घडला आहे.

अंधेरीच्या सहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत संतोषी माता नगरामध्ये ही मन सुन्र करणारी घटना घडली. श्रेयस अमोल कदम या चिमुकल्याने गेल्याच महिन्यात वयाची चार वर्ष पूर्ण केली होती. श्रेयसच्या या क्रुर हत्येने कदम कुटुंब शोकसागरात बुडाले आहे.

आरोपी महीला मधु गाळे ही श्रेयशची नात्याने  मावस मामीच लागते.  शेजारीच ती राहते. मधु गाळे व कदम कुटुंब जवळ जवळच राहतात जुना कौटुंबिक राग तिच्या मनात काही दिवसांपासून धुमसत होता.

श्रेयस खेळत असताना मधुने त्याला तिच्या घरी नेले आणि त्याचा गळा लेगिजने आवळला आणि नंतर त्याला चक्क बादलीतच बुडवून ठेवला. आणि तिथेच त्या निष्पाप जीवीचा अंत झाला.

या प्रकरणी आरोपी मधु गाळेला अटक झाली असून अधिक तपास चालू आहे. मात्र श्रेयशच्या जाण्याने परीसरात चिंतेच आणि दु:खद वातावरण निर्मान झाल आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अचानक आलेल्या नाल्याच्या पुरामध्ये चौघांचा मृत्यु, बैलगाडीसोबत आजोबा नातूही गेले वाहून

-कोरोना असल्याच्या संशयाने तरुणीला फेकल बस बाहेर, तिथेच झाला मृत्यु

-धक्कादायक! तृथीयपंथीयांनी कापले तरुणाचे गुप्तांग