उद्धवजी, पीडितेचा जीव वाचवा… तिच्यावर चांगल्या रूग्णालयात उपचार करा- चित्रा वाघ

मुंबई |  वर्ध्यातल्या हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार काल घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. ही तरूणी मृत्यूशी झुंज देतीये. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पीडितेवर मल्टीस्पेशालिटी रूग्णायलात उपचार व्हावेत आणि तिचा जीव शासनाने वाचवावा, अशी कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

पीडितेच्या जागी आपण स्वत: आहोत किंवा आपल्या घरातील कुणी आहे, असं जर समजलं तर या घटनेची तीव्रता अधिक ठळकपणे लक्षात येईल. माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की तिच्यावर चांगल्यात चांगल्या मल्टीस्पेशालिटी रूग्णायलात उपचार करावेत, असं त्यांनी म्हटलंय.

पीडितेच्या मेडिकलचा खर्च, प्लास्टिक सर्जरीचा खर्च आणि रिहॅबचा खर्च शासनाने उचलावा, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे. दुसरीकडे काल झालेल्या घटनेत प्राध्यापिका 40 टक्के भाजली आहे. तिचा चेहरा पूर्णपणे जळाला आहे. तिला श्वसनाला देखील त्रास होतोय.

दरम्यान, माझ्या मुलीवर जसं त्याने पेट्रोल टाकलं तसं त्याच्यावरही पेट्रोल टाका आणि त्यालाही जिवंत जाळा, अशी मागणी पीडितेच्या आईने केली आहे.

 

 

महत्त्वाच्या बातम्या-

-“NRC लागू होण्याच्या भीतीने 32 जणांचा जीव गेला”

-…अन् राज ठाकरेंनी दिलं संजय मिस्त्रींना मनसेत येण्याचं निमंत्रण!

-उद्धवजी, शिवजयंती साजरी करताना तिथी सोडा आणि तारीख धरा; राष्ट्रवादीचं आवाहन

-भाजप खासदाराच्या चोराच्या उलट्या बोंबा; आता म्हणतात मी तसं म्हणलोच नाही…!

-‘त्या’ राक्षसालाही पेट्रोल टाकून जिवंत जाळा; पीडितेच्या आईची मागणी