“आज ती जळाली नाही तर समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला”

मुंबई | हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून आक्रोश व्यक्त केला जात आहे. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिली असून आरोपीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावर आपली उद्वीग्न प्रतिक्रिया दिली आहे.

हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला. कोणत्या शतकातं आहोतं आपण,दिवसेंदिवस महिलांचे प्रश्न कमी न होता वाढताहेत. बाई म्हणून तिच्या कतृत्वाच्या कहाण्यांपेक्षा अत्याचाराच्या कहाण्या होताहेत. कोण जबाबदार याला कोण घेणार जबाबदारी. , असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय… महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला, आपण या ‘हिंसक-पुरुषी’ मानसिकतेशी संघर्ष सुरू करूया, असं त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेची सात दिवस मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. पीडितेने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला.

 

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

-महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला; माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय- यशोमती ठाकूर

-राज साहेब, तुम्ही हिंसा करण्याची भाषा करत असाल तर…- नवाब मलिक

-नराधमाला माझ्यासमोर जाळून मारा; पीडितेच्या वडिलांची संतप्त प्रतिक्रिया

-…म्हणून मागासवर्गीयांसाठी आरक्षण लागू करण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही- सर्वोच्च न्यायालय