पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिकेवर नागरिकांची दगडफेक

हिंगणघाट | हिंगणघाटच्या पीडितेचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रूग्णवाहिकेवर संतप्त नागरिकांनी दगडफेक केली आहे. नागरिकांनी पोलिसांवर देखील जोरदार दगडफेक केलीये. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.

काही समजूतदार नागरिकांनी यावेळी दगडफेक करू नका, असं सांगितल्यावर त्यांनी दगडफेक बंद केली. यामध्ये रूग्णवाहिकेच्या काचा फुटल्या. यावेळी नागरिकांनी आरोपीला तात्काळ फाशी द्या, अशी जोरदार घोषणाबाजी केली.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडित तरुणीची सात दिवसांपासून सुरु असलेली मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. तिने आज सकाळी 6.55 वाजता अखेरचा श्वास घेतला. या घटनेवर महाराष्ट्रभरातून उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरोडा गावात अतिशय शोकाकूल वातावरण आहे. पीडितेचा मृतदेह सध्या तिच्या घरी आणण्यात आला आहे. यावेळी तिच्या आई-वडिलांच्या अश्रूंचा बांध फुटला.

महत्त्वाच्या बातम्या-

-त्याला आम्ही जिंवत जाळू, त्या नराधमाला फक्त 10 मिनीटं आमच्या ताब्यात द्या; पीडितेच्या मामाची मागणी

-मी हिरोपेक्षा काही कमी नाही- अशोक चव्हाण

-“आज ती जळाली नाही समाजाचा व व्यवस्थेचा बुरखा जळाला; हिंगणघाटच्या निर्भयाचा आज वेदनादायी अंत झाला”

-पुण्यात अ‌ॅसिड टाकण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

-महाराष्ट्राच्या लेकीचा जीवनाशी संघर्ष संपला; माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय- यशोमती ठाकूर