नाशिक महाराष्ट्र

“ज्यांच्या विरोधात 35 वर्ष संघर्ष केला त्यांनीच माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला”

मुक्ताईनगर |   काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष एकत्र आले आहेत. जे आमच्यासोबत 25-30 वर्ष होते त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला नाही मात्र ज्यांच्याविरोधात आम्ही 30 ते 35 वर्ष संघर्ष केला त्यांनी माझ्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आज मुक्ताईनगरमध्ये शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या मंचावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

माझ्या सरकारचा केंद्रबिंदू हा शेतकरी आहे. शेतकऱ्याला मदत कशी द्यायची, पाणी कसं द्यायचं, शेतकरी कर्जातून कसा मुक्त होईल, याचा विचार सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

भाजपवर टीकेचा बाण सोडताना उद्धव म्हणाले, एप्रिल-मे मध्ये कशाला तुमच्यात जर हिम्मत असेल तर उद्या किंवा आताच सरकार पाडून दाखवा.

ऑपरेशन लोटस कसलं करता… तुम्हालाच लोटलं ना लोकांनी, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ऑपरेशन लोटसची खिल्लीही उडवली. तीन चाकाच्या रिक्षाचं हे सरकार आहे. या रिक्षाची तिन्ही चाकं वेगवेगळ्या दिशेला आहेत. त्यामुळे लवकरच हे सरकार पडेल, अशी टीका विरोधक सातत्याने करत आहेत. विरोधकांच्या याच टीकेला मुख्यमंत्र्यांनी आज उत्तर दिलं.

मुक्ताईनगरमध्ये सभा होती त्यामुळे साहजिकच मुख्यमंत्री एकनाथ खडसेंवर काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. मुक्ताईनगर मुक्त झालं आहे कुणापासून ते तुम्हाला चांगलंच माहित आहे. तुम्हीच त्यांना बाजूला केलं आहे, अशी कोपरखळी उद्धव ठाकरेंनी मारली अन् उपस्थितांमध्ये एकच खसखस पिकली.

महत्त्वाच्या बातम्या-

-“महापरिक्षा पोर्टल बंद करण्याविषयी सरकारने तातडीने घोषणा करावी”

-ठाकरे सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय; सरकारी कामांसाठी जाताना आता सातबारा नेण्याची गरज नाही!

-महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही कार्यकर्ते गद्दार आहेत- राज ठाकरे

-हिम्मत असेल तर भाजपने सरकार पाडून दाखवावं; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आव्हान

-पोरींना ‘लव्ह मॅरेज’ करू नका अशी नाही… तर चांगला ‘बॉयफ्रेंड’ निवडा अशी शपथ द्या- इंदुरीकर महाराज