Top news महाराष्ट्र मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आमदारकीची शपथ

uddhav mla

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची (आमदारकीची) शपथ घेतली.  विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी दुपारी 1 वाजता उद्धव ठाकरे यांना शपथ दिली.

शपथविधीसाठी उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या आणि बाकी 8 सदस्यांच्या शपथवविधीला उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंची  विधानपरिषदेच्या सदस्यपदी वर्णी लागल्यामुळे महाविकास आघाडीवरचं संकट दूर झालं आहे. आता महाविकास आघाडीला कोणताही धोका नसणार आहे.

मुख्यमंत्र्यांसह 9 नवनिर्वाचित आमदारांचा  शपथविधी विधानभवनात पार पडला. उद्धव ठाकरे यांच्यासह शिवसेनेकडून नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेची शपथ घेतली. काँग्रेस कडून राजेश राठोड, तर राष्ट्रवादीकडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी शपथ घेतली. भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील, गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली.

महत्वाच्या बातम्या-

-तुझ्या भीक माग्या देशासाठी काहीतरी कर; ‘या’ भारतीय क्रिकेटपटूचा आफ्रिदीला कडक सल्ला

-… तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आपला गणवेश बदलावा लागला नसता- अनुराग कश्यप

-आफ्रिदी गेला खड्ड्यात, देशासाठी मी बंदूक उचलेन- हरभजन सिंग

-महाराष्ट्राच्या साहित्य विश्वातील अमुल्य साहित्य ‘रत्न’ निखळलं; मुख्यमंत्र्यांची मतकरींना आदरांजली

-तज्ज्ञ अहवाल आता आवरा आणि इशाऱ्यांचे नगारे देणे थांबवा; संजय राऊत संतापले