महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट येऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदींना, महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची लाट येऊन देणार नाही, असं ठामपणे म्हणाले.

राज्यातील मृत्यू दर कमी करण्याचा प्रयत्न केला जात असून मुंबईतील धारावी, वरळी येथील स्थिती नियंत्रणात आणल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र अजुनही लढाई संपली नाही. कोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्रात येऊ देणार नाही यासाठी प्रयत्नशील असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

राज्यात कोरोना उपचारासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि इतर सुविधांसह सज्ज अशा साडेतीन लाख खाटा उपलब्ध आहेत. मात्र या सुविधांसाठी डॉक्टर, नर्से, कर्मचारी यांची गरज असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रासोबतच गुजरात, पश्चिम बंगाल, पंजाब, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, बिहार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या-

अखेर सचिन पायलट यांनी उलगडले बंड पुकारण्यामागचे कारण

मायदेशी परतलेल्या लेकीनं काही नराधमांच्या ‘या’ कृत्यामुळे गमावले आपले प्राण

सुशांतच्या मृतदेहाचा हा भाग तुटल्याप्रमाणे दिसत होता; सुब्रमण्यम स्वामींचा धक्कादायक खुलासा!

फडणवीसांसोबत माझं बोलणं झालंय, तुम्ही जिम सुरू करा; राज ठाकरे मैदानात

कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणतात, महाराज ही फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही त्यांनी नाक खुपसण्याची गरज नाही