यंदा गणेशाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात, असं आवाहन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच यावेळी यंदाच्या वर्षी गणेशाची आगमन आणि विसर्जन मिरवणूक निघणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.

श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी व गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दी करू नये असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीही सुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानी टाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही, असं ते म्हणाले.

दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी, ईद, माउंट मेरीची जत्रा येणार, गोविंदा आणि गणेशोत्सव मंडळांनी सामाजिक भान राखण्याचा दाखवलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

-इंधन दरवाढीविरोधात 29 जूनला काँग्रेसचं राज्यव्यापी आंदोलन!

-राज्यातील ‘या’ भागात पुन्हा लॉकडाउन लागू

-कोरोनावरील ‘ही’ औषधं मोफत देण्याचा सरकारचा विचार- उद्धव ठाकरे

-प्रसारभारतीकडून ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला इशारा; मुलाखत ठरली वादाचं कारण

-“कोरोनाचे मृत्यू लपवायचेच असते तर…..” राजेश टोपे यांनी केला खुलासा