इम्तियाज जलील यांची ‘ही’ गंभीर तक्रार; मुख्यमंत्र्यांची तिथेच दिले कारवाईचे आदेश!

औरंगाबाद | शहरातील घाटी रूग्णालयात औषधांचा काळाबाजार चालू असून गरीब रूग्णांना लुबाडण्यात येत आहे, अशी तक्रार एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यासंबंधी पुरावे गोळा करून संबंधित मेडिकलचे लायसन्स त्वरित रद्द करण्याचे आदेश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद लोकप्रतिनिधींशी व्हिडीयो काॅन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीला पालकमंत्री सुभाष देसाई, खासदार इम्तियाज जलिल, आमदार संजय शिरसाठ, अंबादास दानवे व इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

औरंगाबाद शहरातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पालकमंत्री घेत असतानाच जलिल यांनी प्रशासनातील अपयशाचा पाढाच वाचला. घाटी हाॅस्पिटलात कोरोना संक्रमित रूग्णांना योग्य उपचार मिळत नसून या रूग्णांची महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या अंतर्गत उपचार करण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

शहरातील औषधांचा काळाबाजारही जलिल यांनी निदर्शनास आणला. डाॅक्टर रूग्णांना महाग इंजेक्शन मागवत आहेत तर मेडिकल दुकानदार ही इंजेक्शन चढ्या दरात विकत असल्याचं त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. यावर पुरावे गोळा करून कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

 

-सलग 20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भडका; आजचा दर जाणून घ्या…

-राहुल गांधींनी पुन्हा काँग्रेसचं नेतृत्व करावं, पक्षातील ‘या’ नेत्याची मागणी