Top news मनोरंजन

दिलासादायक! अमिताभ बच्चन यांना आज मिळणार डिस्चार्ज

मुंबई | महानायक अमिताभ बच्चन यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते. मात्र आता अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. आज अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

अमिताभ यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांचे चाहते आनंद व्यक्त करत आहेत. अमिताभ बच्चन यांच्या अगोदर त्यांची सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांचाही कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता.

11 जुलै रोजी बिग बींचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्यांचे चाहते अमिताभ लवकर बरे व्हावेत म्हणून प्रार्थना करत होते. रुग्णालयात असताना अमिताभ सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांशी सतत जोडलेले होते.

दरम्यान, अमिताभ यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली होती. त्याबरोबरच चाहत्यांचे आभार मानत चाहत्यांना भेटण्याची ईच्छाही व्यक्त केली होती.

महत्वाच्या बातम्या-

मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

‘…म्हणून मी सुशांतच्या अंत्यविधीला गेले नाही’; ट्रोलर्सच्या प्रश्नांवर मौन सोडत अंकिता लोखंडेनं सांगितलं कारण

अबब ! कोरोना नसतानाही तरुणावर केले कोव्हीडचे उपचार अन्…

संतापजनक! देशाच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या सीआरपीएफच्या जवानानंच महिलेबरोबर केलं ‘हे’ धक्कादायक कृत्य

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात उद्धव ठाकरे काँग्रेस आणि बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली- उपमुख्यमंत्री