Top news खेळ

आयपीएलचा रोमांच! ‘या’ खेळाडूंमध्ये रंगलीय पर्पल आणि ऑरेंज कॅपसाठी चुरस

ipl 2022 e1644685331975
Photo Courtesy- Twitter/@IPL

मुंबई | ‘आयपीएल 2022’चा हंगाम आता संपत आला आहे. प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी तब्बल 7 संघांमध्ये अद्यापही चुरस चालू आहे.

आयपीएलच्या सुरूवातीपासूनच काही खेळाडूंनी आपल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं आहे. अशात मग पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपची शर्यत देखील चुरशीची झाली आहे.

ऑरेंज कॅप सध्या राजस्थान राॅयल्सचा धाकड फलंदाज जाॅस बटलरकडं आहे. तर पर्पल कॅपवर बंगळुरूचा गोलंदाज वनिंदू हसरंगानं आपली पकड जमवली आहे.

काही खेळांडूंनी गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करून पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपची शर्यत आणखी रंगवली आहे. शिखर धवन, फाफ ड्यू प्लेसिस यांनी अव्वल पाचमध्ये जागा मिळवली आहे.

बटलरनं तीन शतकं आणि तीन अर्धशतकांच्या सहाय्यानं 625 धावा फटकावल्या आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर लखनऊचा कर्णधार केएल राहुल आहे.

पर्पल कॅपच्या शर्यतीत बंगळुरूचा वनिंदू हसरंगा, राजस्थानचा युजवेंद्र चहल, कगिसो रबाडा यांच्यात जोरदार चुरस रंगली आहे. परिणामी पर्पल कॅपची शर्यत अधिक रंगतदार झाली आहे.

दरम्यान, आयपीएल 2022 च्या हंगामात मातब्बर असलेले मुंबई आणि चेन्नई हे संघ लवकरच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. अशात आता नवीन विजेता मिळण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘उद्धवजी राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसचा दबाव झुगारून…’; सभेपूर्वी मनसेचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

 “ज्यांनी बोलायला पाहिजे ते तर मोदींचे दास झालेत”

 ‘महिला असलीस तरी छपरीच तू’; राष्ट्रवादीकडून केतकीवर जहरी टीका

“राष्ट्ररक्षणासाठी हिंसा करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलाय” 

दाऊद इब्राहिम गँगच्या टार्गेटवर कोण?; NIA च्या तपासातून धक्कादायक खुलासा