Loading...
पुणे महाराष्ट्र

शरद पवारांच्या हत्येचा कट, पुणे पोलिसांकडे तक्रार दाखल

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याची तक्रार पुणे पोलिसांकडे दाखल झाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीतून आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लक्ष्मीकांत खांबिया यांनी शरद पवार यांच्या जीवाला धोका असल्याची लेखी तक्रार पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला दिली.

Loading...

काही वेबपोर्टलवरुन शरद पवार यांच्याविरोधात चिथावणीखोर भाषणांचे व्हिडीओ टाकले जात आहेत. त्याखाली शरद पवार यांच्याविरोधात टोकाच्या कमेंट केल्या जात आहेत. या कमेंटवरुन शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा आरोप लक्ष्मीकांत खांबिया यांनी केला आहे.

दरम्यान, सोशल मीडिया सातत्याने शरद पवार यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यात चिथावणीखोर भाषाही वापरली जाते. याची दखल घेऊन तातडीने अशा कमेंटमध्ये करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत खांबिया यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या- 

-नवऱ्याला आवडली नाही नवरीची साडी म्हणून नवऱ्याने मोडली संसाराची घडी

-…तर ओबीसी समाजाने जनगणनेवर बहिष्कार टाकण्याची भूमिका घ्यावी- नाना पटोले

-‘झोपु’च्या नव्या कार्यालयावरुन अजित पवारांची नाराजी!

-देशाचे पंतप्रधान गांधीजींसमोर नतमस्तक होतात पण…- जितेंन्द्र आव्हाड

-मनसेत इनकमिंग सुरू; दोन दिग्गज नेत्यांनी केला प्रवेश

Loading...