देश

“योगी आदित्यनाथ नरेंद्र मोदींचं ऐकत नाही मग जनता त्यांचं का ऐकेल?”

लखनऊ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्याचं घोषित केलं आहे. लोकांनी घराबाहेर पडू नका, ही कोरोनाविरुद्ध लढाई आहे. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी साथ द्या असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना केलं. पण त्यांचं आवाहन त्यांच्या पक्षातील नेत्यांकडून न पाळल्याने विरोधकांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अयोध्येला पोहचले. अयोध्येत प्रभू रामाची मूर्ती टेंटमधून हटवून तात्पुरत्या मंदिरात ठेवण्यात आली. राम मंदिराच्या निर्माणानंतर रामाची मूर्ती त्याठिकाणी स्थापित केली जाईल.

Loading...

नवरात्रीचा पहिला दिवस आहे. देवीच्या दर्शनाला जाण्याची माझीही इच्छा होती. पण पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे त्याचं पालन करायला हवं. मात्र उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांचे ऐकत नाहीत मग जनतनं का ऐकावं, असा सवाल उत्तरप्रदेशचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजयकुमार लल्लू  यांनी केला आहे.

दरम्यान, यूपीच्या मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावर काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी टीका केली.  उत्तर प्रदेशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या 35 वर पोहचली आहे.

 

महत्वाच्या बातम्या – 

-होळीला अ‌ॅडमिट, गुढीपाडव्याला डिस्चार्ज; पुण्यातील दाम्पत्याची ‘कोरोना’वर मात

-‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

-जगभरात कोरोनामुळे पहिल्यांदाच घडणाऱ्या गोष्टी

-आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

-सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी