पुणे महाराष्ट्र

विरोधकांनी लक्षात ठेवावं, आमचं सरकार पाच वर्षे टिकणारच- बाळासाहेब थोरात

पुणे | आमच्या सरकारचं चांगल्या प्रकारे काम चालू असताना, विरोधक सतत टीका करत आहेत. मात्र त्यांनी एवढच लक्षात ठेवावं की, आमचं सरकार पाच वर्षे टिकणार आहे, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

देशभरात पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ सातत्याने सुरू आहे. या विरोधात काँग्रेसने आज देशभर आक्रमक पवित्रा घेत आंदोलनास सुरूवात केली आहे. पुण्यात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.

राज्यात कोरोना विषाणुचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यावर राज्य सरकार विशेष उपाय योजना करत आहे. पण एवढ्या मोठ्या संकटात देखील विरोधक राजकारण करत आहेत, असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, आपल्या सर्वांवर कोरोना विषाणुचं एवढे मोठं संकट असताना प्रत्येक राज्य त्याला सामोरे जात आहे. मात्र त्याच दरम्यान केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ करून सर्व सामन्याचे कंबरडे मोडत आहे. याच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करत असून, सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी देखील थोरातांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या-

-…तेव्हा गप्प का?, पडळकरांवरुन राष्ट्रवादी राजकारण करत आहे- देवेंद्र फडणवीस

-सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी आता ‘या’ अभिनेत्रीची चौकशी होणार

-शोएबला भारतात असलेली त्याची पत्नी सानियाला भेटायचं आहे पण…

-राज्यात जून महिन्यात आतापर्यंत जवळपास 29 लाख थाळ्यांचं वाटप, भुजबळांची माहिती

-वारकऱ्यांच्या वेशात गृहमंत्री… अनिल देशमुखांचं पंढरीच्या पांडुरंगाला साकडं