Rajya Sabha Election Result | अखेर निकाल लागला; संजय राऊतांसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी

मुंबई | राज्यसभेच्या सहा जागांसाठी असणाऱ्या या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उतरवल्याने चुरस वाढली होती.  महाविकास आघाडीकडून आपले उमेदवार निवडून यावेत यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु होते. त्यामुळे निवडणुकीच्या एक दिवसआधी रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीचे बैठकींचं सत्र सुरु होतं.

भाजपने सातवा उमेदवार उतरवल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. पण अखेर ही निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच डंका वाजला आहे.

प्राथमिक निकाल हाती आला आहे, संजय राऊत 42 मतं घेऊन विजय झाले आहे. राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि इम्रान प्रतापगढी यांचा विजय झाला आहे.

धनंजय महाडिक यांनी शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव केला आहे. अखेरीस 9 तासांच्या प्रतिक्षेनंतर निकाल हाती आला आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) 3 उमेदवार विजयी झाले आहे. तर भाजपचे दोन उमेदवार विजयी झाले आहे. पण, अपक्षांची मत फुटलं असल्याची समोर आलं आहे.

दरम्यान, भाजपने सातवा उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीची धाकधूक वाढली होती. त्यामुळे महाविकास आघाडीने भाजपसमोर बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव ठेवला. पण भाजपने तो प्रस्ताव धुडकावला.

महत्त्वाच्या बातम्या- 

“ईडीचा डाव फसला, आता रडीचा डाव सुरू झाला, तरी आम्हीच जिंकू”

Rajyasabha Election | सर्वात मोठी बातमी; राज्यसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट 

“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं आणि…” 

Rajyasabha Election | गुलाल आम्हीच उधळणार- उद्धव ठाकरे 

अमृता फडणवीसांच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज; केली ‘ही’ नवी घोषणा