“चीनच्या पंतप्रधानांना मोदी 19 वेळा भेटले, काय निष्पन्न झालं?”

सातारा | चीनच्या पंतप्रधानांना नरेंद्र मोदी 19 वेळा भेटले, पण यातून काय निष्पन्न झाले?, असा सवाल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी केलाय. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात साताऱ्यात चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसने आंदोलन केलं आहे.

साताऱ्यातील काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण चव्हाण बोलत होते.

केंद्र सरकार हे दिशाहीन आणि हातपाय गळालेले सरकार आहे. नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक मैत्रीवर पररराष्ट्र धोरण ठरत नाही, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे, असा घणाघात पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

स्वतःच्या शपथ विधीला मोदींनी इतर राष्ट्रांच्या प्रमुखांना बोलावलं, म्हणून आपण मोठं काम करतोय असे होत नाही, अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-शिरुर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीकडून सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी

-…तो पर्यंत शहीद झालेल्या 20 जवानांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही- अरविंद केजरीवाल

-“पेंग्विनच्या अंड्यातून बाहेर आलेला कोण आहे हा वरुण सरदेसाई?”

-आरोग्य विभागामार्फत प्लाझ्मा संकलनासाठी…., राजेश टोपेंची घोषणा

-भिडे गुरूजी, लवकरच ठणठणीत बरा होऊन हा पैलवान आपले आशीर्वाद घेण्यास येईल- महेश लांडगे