Loading...
महाराष्ट्र मुंबई

“राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच!”

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज मुंबईत भव्य असा मोर्चा काढला. यावेळी सभेत बोलताना राज यांनी सीएएवर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच घुसखोरांना हाकललेच पाहिजे, असं म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

राजकारण व्यवसाय समजला की भूमिका, झेंडे आणि भाषा बदलतेच! भूमिका केवळ वैयक्तिक नफा- नुकसान पाहून घेतल्या की मग मोर्चे काढा वा चिथावणीखोर भाषणे करा जनतेच्या दृष्टीने त्यांची किंमत शून्य असते. भाजपच्या “धार्मिक-द्वेष एक्स्प्रेस” करिता मनसेने इंजिन भाड्यावर दिले पण इथेही ते फेल होईल!, अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे.

Loading...

राज ठाकरे यांनी आपला झेंडा आणि अजेंडा बदलला आहे. तसेच त्यांनी हिंदूत्वाकडे झुकणारी भूमिका घेतली आहे. यावरुन विरोधकांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी पाकिस्तान आणि बांगलादेशमधून आलेल्या घुसखोरांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. भारत ही काही धर्मशाळा वाटली काय? असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-मला हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही, कारण ते शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे- उद्धव ठाकरे

-काॅंग्रेसच्या महिला खासदाराचा ‘हा’ व्हीडिओ तुफान व्हायरल

-“केंद्र सरकार चांगलं काम करतं त्यावेळी मी भाजपचं कौतुक केलं आणि काही चुकीचं दिसलं त्यावेळी सरकारवर टीकाही केली”

Loading...

-“केंद्र सरकारला सांगतोय, पोलिसांना फक्त 48 तास द्या, मग बघा…”

-माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय?; असं म्हणत राज ठाकरेंनी दिलं सीएएला समर्थन

Loading...