IFSC गुजरातला नेलं जात असताना फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही- पृथ्वीराज चव्हाण

सातारा | आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र गुजरातमध्ये करण्याच्या निर्णयावरुन माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे.

आयएफएससी गुजरातमध्ये नेण्याचा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. त्यावेळी हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र महाराष्ट्रात व्हावं म्हणून काहीही प्रयत्न झाले नाही. फडणवीसांनी बोटभर चिट्ठी लिहूनही विरोध केला नाही, असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

2004 मध्ये जेव्हा संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार केंद्रात सत्तेत आलं, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी त्यांनी पहिला निर्णय मुंबईला आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र करण्याचा घेतला, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगतिलं आहे.

दरम्यान, मोदी सरकार सत्तेत आल्याबरोबर मोदी सरकारने तडकाफडकी निर्णय घेतला आणि मुंबई ऐवजी अहमदाबादला हे केंद्र करण्याचं निश्चित केलं. 1 मार्च 2015 ला अहमदाबादच्या गिफ्ट सिटीमध्ये हा निर्णय जाहीर केला. त्यावेळी महाराष्ट्रात फडणवीसांचे सरकार होतं. त्यांनी याविषयी आवाज उठवला का? मात्र, तसं काहीही झालं नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-दिलासादायक! रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला, आत्तापर्यंत 10,000 रुग्ण परतले घरी

-‘असहाय्य मजुरांकडून पैसे घेणं लज्जास्पद’; अखिलेश यादव यांची मोदींवर टीका

-आता तुम्ही सत्ताधारी आहात नुसता शिमगा करु नका, प्रक्रिया पुर्ण करा -आशिष शेलार

-राज्यातील पोलीस दलाला कोरोनाचा विळखा; एकूण 361 पोलिसांना कोरोनाची लागण

-“IFSC सेंटर गुजरातला हलवल्यास देशाचं मोठं आर्थिक नुकसान होईल”