शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवणाऱ्या महात्मा फुलेंना ‘भारतरत्न’ द्या; दलवाईंची मागणी

नवी दिल्ली | देशातील पहिल्या सामाजिक क्रांतीचे उद्घोषक महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात यावं, अशी मागणी काँग्रेसचे खासदार हुसेन दलवाई यांनी राज्यसभेत केली.

1848 साली शाळा सुरू करणारे पहिले भारतीय ठरलेले महात्मा फुले यांनी सदैव सर्व धर्मांना सोबत जोडून विकास आणि शिक्षणावर भर दिला. त्यामुळे त्यांचा भारतरत्न सन्मान करण्यात यावा, अशी मागणी दलवाई यांनी केली.

देशात महिलांचे, शिक्षणाचे, दलितांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणारे महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंनी उपेक्षित, वंचितांसाठी आयुष्य वेचलंं, असंही दलवाई यांनी संगितलं.

दरम्यान, 2018 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राकडे महात्मा फुलेंना भारतरत्न करण्याची शिफारस केली होती.

महत्वाच्या बातम्या-

-‘व्हॅलेंटाईन डे’ला विद्यार्थिनींना शाळेनं दिली शपथ; ‘मी प्रेम आणि प्रेम विवाह करणार नाही’!

-गेहलोत सरकारने ग्रामीण विकास योजनेचं नाव बदललं; गोळवळकर हटवून केलं महात्मा गांधी!

-मागणी तुम्ही केली तर चालते; अन् आम्ही केली तर मग त्यात बिघडलं कुठं?- राज ठाकरे

-पोरगी गेली पळून; अन् बापाने गावात पोस्टर लावून वाहिली श्रद्धांजली!

-शिवरायांवरच्या टिकटाॅक वरील या व्हीडिओने सोशल मीडियावर घातला चांगलाच धुमाकूळ!