काँग्रेसची ‘न्याय योजना’, राज्यातील 29 हजार कुटुंबांना प्रत्येकी ‘इतक्या’ रुपयांचं वाटप

मुंबई | युवक काँग्रेसकडून राज्यात ‘न्याय योजने’ची प्रतिकात्मक अंमलबजावणी करण्यात आली आहे. आज राज्यातल्या 29 हजार कुटुंबियांना 200 रुपये देण्याची प्रतिकात्मक योजना काँग्रेसने हाती घेतली आहे. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशभरात ही योजना लाँच केली होती.

युवक काँग्रेस राज्यातील 29 हजार कुटुंबियांना प्रत्येकी 200 रुपये देण्यात येणार आहे. न्याय योजनेच्या महिन्याच्या 6 हजार रुपयांच्या योजनेचं प्रतिकात्मक वाटप आज युवक काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

कोरोनामुळे मंदीचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वाधिक जनता ही घरात अडकून पडली आहे. या आर्थिक अडचणीत गोरगरीबांना मदत करण्यासाठी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने एखादी योजना राबवावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती. या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील 29 हजार कुटुंबियांना युवक काँग्रेसकडून 200 रुपये देण्यात आले आहेत.

दरम्यान,  महिन्याला 6 हजार म्हणजेच दिवसाला 200 रुपये अशी प्रतिकात्मक मदत युवक काँग्रेसने दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या 29 व्या पुण्यतिथीनिमित्त 21 मे रोजी ही मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी घेतला ‘हा’ स्तुत्य निर्णय

-‘परप्रांतीयांच्या जाण्याने रिक्त जागांवर रोजगाराची संधी साधा’; शिवेंद्रराजेंचं स्थानिकांना आवाहन

-निलेश राणेंविरोधात तृतीयपंथी समाजाकडून गुन्हा दाखल; जाणून घ्या कारण…

-‘धारावी पुनर्विकासाला चालना देण्याची हीच वेळ’; जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

-अशोक मामांनी पुन्हा जिंकली मनं; पोलीस कर्मचाऱ्यांना दिली ‘ही’ खास भेट