‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर इंदोरीकर महाराजांची कोलांटीउडी; म्हणतात…

अहमदनगर |   सम तिथीला स्त्रीसोबत संग केला तर मुलगा आणि विषम तिथीला स्त्रीसोबत संग केला तर मुलगी होते, असं वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात जोरदार रणकंदन सुरू आहे. त्यांना जिल्हा शल्यचिकित्सक यांनी या वक्तव्याप्रकरणी नोटीस बजावली होती. अखेर इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या नोटीसीला आज उत्तर दिलं आहे. मी तसं वक्तव्यच केलेलं नाही, असं अजब उत्तर महाराजांनी दिलं आहे.

युट्युबला आम्ही कोणतेही व्हीडिओ टाकत नाही. तसंच माध्यमं दाखवत आहेत तश्या कोणत्याही प्रकारचं वक्तव्य मी केलेलं नाही, असं नोटीसीला दिलेल्या उत्तरात महाराजांनी म्हटलं आहे. युट्युबला आम्ही काही टाकत नाही आणि रेकॉर्डिंग देखील करत नाही, असं महाराजांनी म्हटलं आहे.

जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात मी अहमदनगर जिल्ह्यात कीर्तन केलेलं नाही. मी समाजप्रबोधन करतो. मला महाराष्ट्र शासनाचा महात्मा गांधी पुरस्कार मिळाला आहे. तसंच राज्याच्या अनेक भागांमधून अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत, असं महाराजांनी नोटीसीला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.

दुसरीकडे इंदोरीकर महाराजांनी म्हटल्याप्रमाणे ते जर तसं बोलले नसतील तर त्यांनी दिलेलं उत्तर समाधानकारक आहे, असं जिल्हा शल्यचिकित्सक यांनी म्हटलं आहे. तसंच विविध वर्तमानपत्रात महाराजांनी असं वक्तव्य केल्याचं छापून आलं आहे त्यांनाही आम्ही नोटीस पाठवली आहे की तुम्ही कोणत्या आधारे असा दावा केलाय. त्यांनी मात्र उत्तर अजून दिलेलं नाहीये.

वर्तमानपत्रांनी महाराज असे बोलले आहेत त्याचे पुरावे द्यावेत. जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत पुढे जाता येणार नाही, असंही जिल्हा शल्यचिकित्सक यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ‘या’ बड्या नेत्यांची नावं चर्चेत!

-“शिवसेना आणि भाजप यांच्या विचारातील समानता कोणी तोडू शकत नाही”

-स्वगृही परतण्याच्या चर्चांवर राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…

-जे भाजपमध्ये गेले ते पुन्हा राष्ट्रवादीत येतील; छगन भुजबळांना विश्वास

-औरंगाबादमध्ये भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन बड्या नेत्यांनी बांधलं शिवबंधन