पाकिस्तानमध्येही झाला कोरोनाचा शिरकाव

कराची | आधी चीन नंतर  युरोप नंतर  भारत अन् आता कोरोनानं पाकिस्तानमध्येही शिरकाव केला आहे. जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोनानं पाकिस्तानचं देखील मोठ्या प्रमणात नुकसान केलं आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळं एकाचा बळी गेला आहे तर 185 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.

फक्त 24 तासांमध्ये 130 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानं संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे. ज्या रूग्णाचा कोरोनामुळं मृत्यु झाला तो इराणहून परतला होता. त्याला पाकिस्तान सीमेवरील रूग्णालयात ठेवण्यात आलं होतं. लाहोरच्या एका रूग्णालयात त्याचा मृत्यू झाला. हा रुग्ण हफीजाबादचा रहिवासी होता.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतांत तर तब्बल कोरोनाबाधित 155 रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या एका आठवड्यापासून कोरोना लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. पहिल्या आठवड्यात पाकिस्तानात 33 रुग्ण सापडले आहेत. फक्त सोमवारी 133 रुग्ण आढळले होते.

विदेशी पर्यटकांना पाकिस्तानने बंदी घातली आहे. बुधवारी ही बंदी लागू होणार असून 3 एप्रिलपर्यंत ही बंदी असणार आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्टेशनवरची गर्दी कमी करण्यासाठी मुंबई रेल्वेने घेतला हा निर्णय 

-सर्व शासकीय कार्यालये 7 दिवस बंद; सरकारचा मोठा निर्णय

-राफेल घोटाळा झाकण्यासाठी ज्यांनी मदत केली त्यांचीच राज्यसभेवर नियुक्ती; काँग्रेसची टीका

-महेश भट्टांनी कोरोनाच्या जनजागृतीसाठी शेअर केली “ही” कविता