महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! एका दिवसात 38 पोलिसांना कोरोनाची लागण

Pune Police023 e1583986597859

मुंबई | एका दिवसात तब्बल 38 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे राज्यभरातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या तब्बल 495 वर पोहोचली आहे. यामध्ये 50 अधिकारी आणि 445 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

दक्षिण मुंबईतील एक आयपीएस अधिकारीही कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं काल समोर आलं होतं. कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह पोलीसही मेहनत घेत आहेत. मात्र हेच पोलीस कोरोनाच्या कचाट्यात येत आहेत. अनेक पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसत आहेत.

42 अधिकारी आणि 414 कर्मचारी अशा एकूण 456 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत. दुसरीकडे आठ अधिकारी आणि 27 पोलीस कर्मचारी असे एकूण 35 जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दुर्दैवाने चार पोलिसांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान, एकीकडे पोलिसांना कोरोनाची लागण होत असताना, दुसरीकडे पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाणही वाढलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आणखी बळी जातील पण अर्थव्यवस्थेला चालना देणं महत्वाचं- डोनाल्ड ट्रम्प

-महाराष्ट्रातली परिस्थिती चिंतेची, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार- केंद्रिय आरोग्यमंत्री

-शाहू राजांचा फडणवीसांकडून कार्यकर्ता म्हणून उल्लेख; ट्रोल झाल्यावर पोस्ट केली डिलीट

-….तरच दारूविक्री सुरू ठेवावी- पृथ्वीराज चव्हाण

-कोरोनाने देशातला विक्रम मोडला; आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण तसंच मृत्यूंची नोंद…!