महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढला, आणखी 5 जणांना लागण

मुंबई | जगभरात कोरोना विषाणूनं हाहाकार माजवला असताना भारतासहीत महाराष्ट्रातही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सतत वाढत चालला आहे. भारतात हा आकडा ५७० पर्यंत पोहोचला आहे.

देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ११२ वर पोहोचली आहे. बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाचे नवीन ५ रुग्ण आढळले आढळल्याने खळबळ उडाली आहे.

सांगलीतील इस्लामपूरमध्ये हे पाच नवे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा आता ११२ वर पोहोचला आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाचे दोन रुग्ण बरे झाले आहेत. हे तेच दाम्पत्य होतं जे दुबईहून पुण्याला आलं होतं. त्यांना आज डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातील दोन दाम्पत्यांना कोरोनाची लागण झाली होती, ते आता बरे झाले आहेत.

महत्वाच्या बातम्या – 

आज रात्री 12 पासून संपूर्ण देशात लॉकडाऊन, घराबाहेर पडण्यास बंदी; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा

-सोशल डिस्टसिंग ठेवणं हाच कोरोनाला रोखण्याचा अंतिम मार्ग- पंतप्रधान मोदी

-पुणेकरांनो पेट्रोल-डिझेल भरायला जात असाल तर जरा थांबा…! फक्त ‘यांनाच’ मिळणार पेट्रोल-डिझेल

-“मी काहीही बंद केलं आहे असं सांगायला नाही तर राज्यातील जनतेला धन्यवाद द्यायला आलोय”

-“सध्या जगभरात, देशात कोरोना विषाणूचं संकट उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला घराबाहेर पडू नका”