कोल्हापूर महाराष्ट्र

कोल्हापूरमध्येही कोरोनाचा शिरकाव; राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 130 वर

मुंबई | राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोल्हापूरमध्येही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. कोल्हापूरमध्ये 2 तर सांगलीमध्ये नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

कोल्हापूरमध्ये एकूण 2 रुग्ण आढळले. आधी कोल्हापूरमध्ये एक रुग्ण आढळला होता. त्यानंतर रात्री उशीरा कोल्हापूर शहरातील एका पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली.

Loading...

संबंधित रुग्ण 22 मार्चला पुण्यातून कोल्हापूरला आल्याची प्राथमिक माहिती आहे. एकूणच आज दिवसभरात राज्यात आतापर्यंत 8 रुग्णांची वाढ झाली आहे.

पुण्यामध्येही 1 रुग्ण कोरोना बाधित सापडला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 131 वर पोहचली आहे.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाविरुद्धचा लढा जिंकल्यानंतरच भीम जयंती साजरी करू- रामदास आठवले

-खासगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवून नियमित रुग्णांची गैरसोय करू नये- उद्धव ठाकरे

-लॉकडाऊनमध्ये पोलिस करत असलेल्या लाठीचारावर शरद पवार म्हणाले…

-अनेक क्षेत्रांना कोरोनाचा फटका; RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या मोठ्या घोषणा

-कोरोनाचा सामना करण्यासाठी शरद पवारांनी केली ‘ही’ मोठी घोषणा