कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतलाय- अजित पवार

मुंबई | राज्यातली शासकीय यंत्रणा कोरोनाविरुद्धच्या लढ्यासाठी सज्ज आहे. कोरोनाग्रस्तांवर मोफत उपचार करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून हजार शासकीय व खाजगी रुग्णालयांत ‘महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हे उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.

राज्यातल्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत झालेली वाढ वैयक्तिक संपर्कातून झालीय. समूह संसर्गाची लक्षणं अद्याप आढळलेली नाहीत. योग्य काळजी घेतल्यास कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला आजही वाचवू शकतो. त्यासाठी जनतेनं घराबाहेर न पडण्याचा दृढनिश्चय करावा, असं आवाहन त्यांनी राज्यातल्या जनतेला केलं.

राज्यातली कोरोना रुग्ण संख्या मर्यादित ठेवायची असेल तर, प्रत्येकानं लॉकडाऊनचं पालन करून घरीच थांबावं. कुठेही गर्दी करू नये. परराज्यातील मजूरांनी आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. त्यांच्या निवास, भोजनाची व्यवस्था संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल, असंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, डॉक्टर,आरोग्य,पोलीस,महसूल,बँक कर्मचारी तसंच विविध शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आभार मानत पंतप्रधान मोदींनी मन की बात कार्यक्रमातून केलेल्या आवाहनाचं जनतेनं पालन करावं. राज्य सरकार, केंद्र सरकार व आपण सारे देशवासी मिळून ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या –

-कोरोनाच्या लढ्यात विठूरायाही आला मदतीला; विठ्ठल मंदिराकडून 1 कोटींची मदत

-कोटक बँकेची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 10 कोटींची घसघशीत मदत

-कॉंग्रेसचे आमदार-खासदार कोरोनाच्या लढाईसाठी देणार एका महिन्याचं वेतन

-नवउद्योजकांना आपल्या व्यवसायासाठी फंडिंग मिळवण्याची मोठी संधी!

-संकटाच्या काळात राजदेखील मला फोन करतोय- उद्धव ठाकरे